-
“वक्त बदलते देर नही लगती…”, अशी एक प्रसिद्ध शायरी आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याबाबत ही शायरी खरी ठरली आहे. पाच महिन्यांपूर्वी झेलेन्स्की यांचा अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये ‘वाईट’ अपमान झाला होता. आज त्याच ठिकाणी त्यांची स्तुती करण्यात आली.
-
२८ फेब्रुवारी २०२५ रोजी युक्रेन-रशिया युद्धात तोडगा काढण्यासाठी झेलेन्स्की आणि ट्रम्प यांची व्हाईट हाऊसमध्ये बैठक झाली. पण ट्रम्प आणि त्यांचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी विन्स यांनी झेलेन्स्कींना चांगलेच फैलावर घेतले.
-
झेलेन्स्की यांना खिंडीत गाठून त्यांच्यावर आवाज चढविण्यात आला. आमच्या माजी मुर्ख राष्ट्राध्यक्षांनी तुम्हाला अब्जावधींची खैरात वाटली, असे सांगून ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांचा पाणउतारा केला होता.
-
एवढेच नाही तर व्हाईट हाऊसमध्ये या बैठकीचे वार्तांकन करायला आलेल्या एका पत्रकारानेही झेलेन्स्कीचा अवमान केला. तुम्ही राष्ट्राध्यक्षांना भेटायला येताना लष्करी गणवेश का घातलाय? कोट का नाही घातला? असा प्रश्न पत्रकाराने विचारला.
-
इतका अपमान गिळून झेलेन्स्की व्हाईट हाऊसमधून तडकाफडकी निघून गेले. राष्ट्राध्यक्षांसाठी बनलेले जेवणही त्यांना दिले गेले. झेलेन्स्की एवढा अपमान एखाद्या राष्ट्राध्यक्षाचा क्वचितच झाला असेल.
-
पाच महिन्यांनी अचानक वेळ बदलली. ज्या ट्रम्प यांनी झेलेन्स्कीचा अवमान केला होता. आज त्यांनीच व्हाईट हाऊसमध्ये आवतण देऊन झेलेन्स्की यांचे तोंडभरून कौतुक केले.
-
सोमवारी (दि. १८ ऑगस्ट) रोजी व्हाईट हाऊसमध्ये युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की आणि ट्रम्प यांची बैठक पार पडली. यावेळी झेलेन्स्की यांनी त्यांचा ट्रेडमार्क सुट न घालता काळ्या रंगातला सूट घातला होता.
-
यावेळी ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांच्या सुटचे कौतुक केले. तसेच पाच महिन्यांपूर्वी पत्रकार ब्रायन ग्लेन यांनी अवमान केला होता, तेच यावेळी म्हणाले, “तुम्ही त्या सूटमध्ये खूप छान दिसता”
-
ट्रम्प यांनी लगेच या संवादात उडी घेत म्हटले, मीही यांच्या कपड्याचे कौतुक केले. त्यानंतर ते झेलेन्स्की यांच्याकडे वळत म्हणाले, यांनीच पाच महिन्यांपूर्वी तुम्हाला तो प्रश्न विचारला होता. झेलेन्स्की यांनीही खिलाडू वृत्तीने ही परिस्थिती हाताळली. ते म्हणाले, मी यांना (पत्रकार) चांगला ओळखतो. आजही ते तोच सुट घालून आले आहेत आणि बैठकीत एकच हशा पिकला.
-
डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची भेट घेतल्यानंतर दोनच दिवसात झेलेन्स्कींचीही भेट घेतली. लवकरच ते या दोन राष्ट्राध्यक्षांची समोरासमोर भेट घालून समेट घडवून आणणार आहेत. त्यामुळे त्यांनी झेलेन्स्की यांची चांगलीच सरबराई केली.
वेळ बदलायला वेळ लागत नाही! आधी अपमान केला आता स्तुती, ट्रम्प-झेलेन्स्की भेटीत कपड्यांवरून काय घडलं?
Donald Trump Zelensky Meeting in White House: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांची व्हाईट हाऊसमध्ये बहुचर्चित बैठक पार पडली. पाच महिन्यांपूर्वी झेलेन्स्की यांना याच व्हाईट हाऊसमध्ये अपमानास्पद वागणूक देण्यात आली होती. आज त्यांचा सन्मान करण्यात आला. (सर्व फोटो – AP/PTI)
Web Title: Donald trump meeting with ukrainian president volodymyr zelensky praises fabulous suit what happen in white house kvg