-

आपण सर्वांनी कधी ना कधी ऐकलेलं वाक्य, “भय्या, एक झेरॉक्स देना” इतकं सर्वसामान्य झालंय की, त्यामागे खरी कहाणी आहे, हे आपण विसरतो.
-
कॉलेज असो, सरकारी ऑफिस असो किंवा अगदी कोपऱ्यावरचं स्टेशनरीचं दुकान, झेरॉक्स हा शब्द इतका अंगवळणी पडलाय की, ‘फोटो कॉपी’ हा मूळ शब्द कुणाला आठवतच नाही.
-
पण गंमत अशी की, झेरॉक्स हा प्रत्यक्षात अर्थाच्या अनुषंगानं वापरला जाणारा शब्द नाही, तर ते एका अमेरिकन कंपनीचं नाव आहे, ज्यानं जगभरात कॉपी मशीनचं साम्राज्य निर्माण केलं.
-
१९३८ मध्ये चेस्टर कार्लसन नावाच्या संशोधकानं ‘झेरोग्राफी’ नावाची प्रक्रिया शोधली आणि शाई किंवा कार्बन पेपरशिवाय कॉपी काढणं शक्य झालं.
-
याच तंत्रज्ञानावर आधारित ‘Xerox 914’ नावाचं पहिलं प्लेन पेपर कॉपियर मशीन १९५९ मध्ये आलं आणि ते इतकं गाजलं की, कंपनीचं नावच Xerox Corporation पडलं.
-
या मशीनच्या अफाट यशामुळे ‘झेरॉक्स’ हा शब्द हळूहळू ‘फोटो कॉपी’साठी पर्याय बनला आणि लोकांच्या जिभेवर तो कायमचा बसला.
-
भारतही त्याला अपवाद ठरला नाही. येथेही “झेरॉक्स काढा,” “झेरॉक्स कर,” किंवा “एक झेरॉक्स दे ना” हे वाक्यांश सवयीचे झाले.
-
पण प्रश्न असा की, हा शब्द इतका वापरला जातो आणि तरीही कधी आपण विचार केला आहे का की, मराठीत झेरॉक्सला नेमकं काय म्हणतात?
-
हा इंग्रजीतून आलेला शब्द इतका लोकप्रिय झाला की, मूळ शुद्ध शब्द शब्दकोशात बंदिस्त राहिला आणि व्यवहारात तो कुणाच्या तोंडावर आलाच नाही.
-
म्हणूनच तुम्ही जर एखाद्या झेरॉक्स सेंटरमध्ये जाऊन शुद्ध मराठी शब्द वापरला, तर दुकानदार गोंधळून जाईल; पण ‘झेरॉक्स’ म्हटल्याबरोबर लगेच ’कॉपी’ मिळेल.
-
हा प्रकार फक्त झेरॉक्सपुरता मर्यादित नाही; ‘गूगल’, ‘बिसलेरी’, ‘थर्मॉस’सारख्या अनेक ब्रँड नावांनी मूळ शब्दावर अधिराज्य गाजवलंय.
-
आणि आता खरा उलगडा- झेरॉक्सला मराठीत ‘छाया प्रत’, ‘प्रतिमुद्रा’ असे प्रतिशब्द आहेत. पण, ते शब्द आता लोकांना ऐकायला इतके वेगळे वाटतात की, व्यवहारात आपण सगळे फक्त ‘झेरॉक्स’ शब्दच वापरतो. (फोटो सौजन्य:Freepik\Photo-AI Generated)
“एक झेरॉक्स दे ना”, असं म्हणणाऱ्यांनो ‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात माहितीये का? उत्तर जाणून घ्या…
Xerox meaning in Marathi: कॉलेज–ऑफिसमध्ये रोज ‘झेरॉक्स’शिवाय पान हलत नाही; पण ‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात? जाणून घ्या उत्तर …
Web Title: Did you know what is the real word for xerox in marathi find out here pdb