-
काही पुस्तकं अशी असतात जी आपल्याला एखाद्या सोबत्यासारखी किंवा मित्रांसारखी वाटतात. नर्मविनोदी पुस्तक असो किंवा अगदी साधं सरळ अंगाने लिहिलेलं पुस्तक असो अनेकदा ही पुस्तकं आपली सोबती ठरतात. अशाच काही पुस्तकांबाबत जाणून घेऊ.
-
व्हर्जिनिया वुल्फ यांनी लिहिलेलं अ रुम ऑफ वन’स ओन हे पुस्तक आपल्याला जगण्याकडे पाहण्याचा एक नवा दृष्टीकोन देतं.
-
रेनर मारिया मिल्के यांनी लिहिलेलं अ लेटर टू यंग पोएट हे देखील तुम्हाला मला आपल्या सगळ्यांना मार्गदर्शक ठरू शकतं असं एक पुस्तक आहे. हे तुम्ही वाचलं आहे का?
-
‘मेन एक्सप्लेन थिंग्ज टू मी’ हे एका अर्थाने विनोदी शैलीतलं पुस्तक आहे. पण हा विनोद नुसता हसवणारा नाही तर विचार करायला लावणारा आहे.
-
अलेन बॉटन यांचं ऑन लव्ह हे पुस्तक हे प्रेम, प्रेमातला आनंद, प्रेमाच्या नात्यातील गुंतागुंत यावर भाष्य करतं. एखादी डायरी वाचल्यासारखा भास आपल्याला या पुस्तकातून होतो.
-
The PROPHET हे पुस्तक खलिल जिब्रान यांचं आहे. आयुष्याबाबतची सत्य सांगणाऱ्या एका तत्त्वज्ञाप्रमाणे हे पुस्तक भासतं. हे तुमच्या संग्रही आहे का?
-
चेरिल स्ट्रेएड यांचे टाइनी ब्युटीफुल थिंग्ज हे पुस्तकही आपल्याला विचार करायला भाग पाडतं. इंग्रजी भाषेतली ही पुस्तकं तुम्ही वाचली आहेत का? नसतील तर नक्की वाचा आणि आयुष्याकडे पाहण्याचा एक नवा विचार मिळवा.
मित्रांसारखी वाटणारी आणि नवा विचार देणारी ही पुस्तकं तुम्ही वाचली आहेत का?
पुस्तकं आपल्याला खूप काही देऊन जातात. त्यांचं वाचन हे अनुभवसंपन्न करणारं ठरतं, अशीच काही खास पुस्तकं तुम्ही वाचली नसतील तर आवर्जून वाचा.
Web Title: Books that feel like conversations and like our friends iehd import scj