• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. which festivals that celebrate nature india and worldwide know interesting facts kvg

दिवाळीला होणारे प्रदूषण नकोसे वाटते? मग निसर्गाचा उत्सव साजरा करणारे सण माहितीयेत का?

हे असे सण आहेत जे जगभरातील निसर्गाचा उत्सव साजरा करतात.

October 20, 2025 10:42 IST
Follow Us
  • Diwali-at-Shivaji-Park
    1/9

    दिवाळीचा सण प्रकाशाचा, उत्साहाचा आणि भरभराटीचा मानला जातो. पण हल्ली रासायनिक आणि मोठ्या आवाजाचे फटाके, झाडांवर होणारी इलेक्ट्रॉनिक रोषणाई यामुळे दिवाळीच्या सणानिमित्त होणाऱ्या प्रदूषाचा मुद्दा काही पर्यावरणप्रेमी उपस्थित करत असतात. (Express photo by Ganesh shirsekar)

  • 2/9

    पर्यावरणप्रेमींचा आणखी एक आक्षेप असतो तो दिवाळीनंतर होणाऱ्या कचऱ्याचा. फटाके, भेटवस्तूंची रिकामी झालेली पाकिटे, प्लास्टिक, फटाक्यातून रस्त्यांवर पसरलेला दारूगोळा, प्लास्टिक कंदील असा हजारो टन कचरा दिवाळीत अनपेक्षितरित्या रस्त्यावर येतो. त्यामुळे काहीजण सणानिमित्त होणाऱ्या प्रदूषणाकडे बोट दाखवतात. (Photo – PTI)

  • 3/9

    पण जगभरात असेही काही सण आहेत, जे
    झाडे, फुले ते नद्या आणि जंगलांपर्यंत असा थेट निसर्गाचा सन्मान करतात. चला काही निसर्ग केंद्रित सणांची माहिती घेऊ. (Source: Photo by Wikimedia commons )

  • 4/9

    वृक्षारोपण दिन: केवळ झाडे लावण्यासाठी आणि त्यांचे संगोपन करण्यासाठी जगभरात वृक्षारोपण दिन साजरा केला जातो. (१८७२ मध्ये नेब्रास्कामध्ये पहिल्यांदा हा सण साजरा केला गेला) हा दिवस जीवनाला आधार देण्यात झाडांच्या भूमिकेचा सन्मान करतो. (Source: Photo by Wikimedia commons )

  • 5/9

    चेरी ब्लॉसम फेस्टिव्हल (जपान): हनामी म्हणून ओळखला जाणारा हा सण शतकानुशतके जुना असल्याचे सांगितले जाते. चेरी ब्लॉसमच्या सौंदर्याला या उत्सव समर्पित आहे. जो नावीन्य आणि जीवनाच्या नश्वरतेचे प्रतीक आहे. (Source: Photo by Wikimedia commons )

  • 6/9

    ग्रीन मॅन फेस्टिव्हल (वेल्स, यूके): ब्रेकॉन बीकन्समध्ये आयोजित होणारा हा उन्हाळी कला आणि संगीत महोत्सव निसर्गात खोलवर रुजलेला आहे. हा महोत्सव पर्यावरणवाद आणि निसर्गाचे प्रतीक असलेल्या गूढ “ग्रीन मॅन” चा उत्सव साजरा करतो. (Source: Photo by Wikimedia commons)

  • 7/9

    कानामारा मत्सुरी (जपान): कावासाकी येथे आयोजित केलेला हा शिंटो उत्सव शेती आणि पिकांच्या संरक्षणाशी जोडलेला आहे. हा सण सुपीकता आणि सृष्टीच्या नैसर्गिक शक्तींचा सन्मान करतो. (Source: Photo by Wikimedia commons)

  • 8/9

    मदेइरा फ्लॉवर फेस्टिव्हल (पोर्तुगाल): मदेइरा बेटावर वसंत ऋतूमध्ये हा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवाला रस्ते फुलांच्या गालिच्यांनी भरलेले असतात. पुनर्जन्म, प्रजनन क्षमता आणि निसर्गाच्या उदारतेचे प्रतीक म्हणून हा उत्सव साजरा केला जातो. (Source: Photo by Wikimedia commons)

  • 9/9

    तू बिश्वत (इस्रायल): “झाडांचे नवीन वर्ष” म्हणून ओळखला जाणारा हा ज्यू सण झाडे लावून आणि जमिनीच्या आत पिकणारी फळे खाऊन, निसर्गाचा सन्मान करत साजरा केला जाणारा अनोखा सण आहे. (Source: Photo by Wikimedia commons)

TOPICS
उत्सवFestivitiesदिवाळी सणDiwali FestivalसणFestivals

Web Title: Which festivals that celebrate nature india and worldwide know interesting facts kvg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.