-

केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी काही दिवसांपूर्वीच जाहीर केले की, भारतीय तंत्रज्ञानाला वाव देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. यासाठी त्यांनी आपला ईमेल जीमेल वरून झोहो मेलवर बदलला. भविष्यात सर्व सरकारी कार्यालयातील अधिकृत ईमेल झोहोचे असतील, असाही प्रयत्न होत आहे. (Photo: Indian Express)
-
कंपनीचे मूल्य किती?
श्रीधर वेम्बू यांनी २८ व्या वर्षी झोहो कंपनीची स्थापना केली होती. या कंपनीचे मूल्य १२.४ बिलियन डॉलर इतके आहे. भारतीय चलनात १.०३ लाख कोटी रुपये इतके कंपनीचे मूल्य आहे. -
झोहो काय करते?
ही कंपनी स्थापन करताना श्रीधर वेम्बू यांनी एक रुपयाचेही भांडवल कर्जाच्या रुपात घेतले नाही. झोहो कॉर्पोरेशन ही एक भारतीय बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनी असून क्लाउड आधारित व्यावसायिक सॉफ्टवेअर निर्माण करते. -
१९९६ साली वेम्बू यांनी AdventNet Inc. या नावाने कंपनीची सुरुवात केली होती. मात्र २००९ साली त्याचे नाव बदलून झोहो कॉर्पोरेशन ठेवण्यात आले. सुरुवातीला या कंपनीने नेटवर्क मॅनेजमेंट सॉफ्टवेअर तयार केले. त्यानंतर कंपनीने छोटे आणि मध्यम व्यावसायिकांसाठी सॉफ्टवेअर त्यार केले.
-
झोहोने व्हॉट्सॲप सारखे एक मेसेजिंग ॲप तयार केले आहे. ज्याचे नाव Arattai आहे. या ॲपची सध्या सर्वत्र चर्चा आहे. आनंद महिंद्रा यांनीही हे ॲप डाऊनलोड केले असून ते याचा वापर करत आहेत.
-
कुठे आणि किती शिकले?
श्रीधर वेम्बू अतिशय साधी जीवनशैली जगतात. तमिळनाडूच्या तंजावूर जिल्ह्यातील एका छोट्या गावात जन्मलेले वेम्बू यांनी आयआयटी मद्रासमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरींगमध्ये बीटेक आणि अमेरिकेच्या प्रिन्स्टन विद्यापीठातून पीएचडी प्राप्त केली. -
शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी १९९४ साली त्यांनी क्वालकॉममध्ये सिस्टिम इंजिनिअर म्हणून नोकरी केली. दोन वर्षांनंतर नोकरी सोडून ते भारतात परतले. यानंतर त्यांनी मित्रांसमवेत एकत्र येऊन कंपनी स्थापन केली. आज त्यांच्या कंपनीचे ५० अधिक उत्पादने आहेत. जी १८० देशांत वापरली जातात.
-
साधी राहणी
श्रीधर वेम्बू आजही साधेपणाने आयुष्य जगतात. त्यांची जीवनशैली सामान्य ग्रामीण भागातील माणसाप्रमाणे आहे. मोठ्या बंगल्यात राहण्याऐवजी ते गावात एका छोट्या घरात राहतात. आलिशान गाड्या घेण्याऐवजी ते सायकलवरून फिरतात. -
संपत्ती किती?
फोर्ब्स २०२४ च्या अहवालानुसार, श्रीधर वेम्बू भारतातील सर्वाधिक श्रीमंत लोकांमधून ३९ व्या क्रमाकांवर आहेत. त्यांची एकूण संपत्ती ५० हजार कोटींच्या आसपास आहे. २०२१ साली भारत सरकारने त्यांना पद्मश्री देऊन गौरविले होते.
Who is Sridhar Vembu: करोडोंची संपत्ती आणि सायकलचा वापर; Zoho चे संस्थापक श्रीधर वेम्बू किती शिकले आहेत?
Sridhar Vembu Lifestyle, Education and Net worth: झोहो कंपनीचे संस्थापक श्रीधर वेम्बू आज कोट्यवधींच्या संपत्तीचे मालक आहेत. मात्र तरीही ते ग्रामीण भागात राहून साधारण जीवनशैली जगण्यास पसंती देतात.
Web Title: How billionaire sridhar vembu started zoho know his education lifestyle and net worth kvg