-

भारतात श्वानांची संख्या मोठी असली तरी अमेरिका, ब्राझील व चीन या देशांमध्ये त्यापेक्षा खूप जास्त प्रमाणात श्वान आहेत. जपानच्या ‘पेट-फ्रेंडली’ संस्कृतीपासून ते रशियाच्या ‘मेट्रो डॉग्स’पर्यंत जगभरात श्वानांवरील प्रेम दिवसेंदिवस वाढताना दिसतेय.
-
श्वान हे जगभरातील सर्वाधिक लोकप्रिय पाळीव प्राण्यांपैकी एक आहेत. मात्र, एकूण संख्येच्या बाबतीत भारत अग्रस्थानी नाही. अमेरिकेसह काही देश भारतापेक्षा खूप पुढे आहेत.
-
स्पेनमध्ये ९.३ दशलक्ष श्वान स्पेनमध्ये सुमारे ९.३ दशलक्ष म्हणजेच ९३ लाख श्वान आहेत. तेथे प्रत्येकी एक लाख लोकांमागे जवळपास १९,४४७ श्वान आढळतात. गेल्या काही वर्षांत या देशात पाळीव प्राणी बाळगण्याचे प्रमाण वाढले आहे.
-
अर्जेंटिनामध्ये वाढते पाळीव प्राण्यांचे प्रमाण अर्जेंटिनामध्ये सुमारे एक कोटी श्वान आहेत. येथे पाळीव प्राणी ठेवण्याची प्रवृत्ती झपाट्याने वाढत आहे. तसेच, सरकारकडून लसीकरण आणि नसबंदी मोहिमा राबवून श्वानांचे आणि लोकांचे आरोग्य सुरक्षित ठेवले जात आहे.
-
जर्मनीतील श्वानसंख्या १०.३ दशलक्ष जर्मनीमध्ये आता १०.३ दशलक्ष म्हणजेच एक कोटी ३ लाख श्वान आहेत. देशातील प्रत्येक एक लाख नागरिकांमागे सुमारे १२,२५१ श्वान आहेत. अनेक जर्मन कुटुंबांमध्ये श्वान हा कुटुंबाचा अविभाज्य भाग मानला जातो.
-
भारतातील श्वानसंख्या आणि समस्या भारतामध्ये सध्या १०.४ ते १२ दशलक्ष म्हणजेच सुमारे एक कोटी ते एक कोटी २० लाख श्वान आहेत. त्यापैकी अनेक श्वान पाळीव असले तरी भटक्या श्वानांची संख्या मोठी असल्यामुळे लसीकरण आणि काळजीअभावी नागरिक आणि प्रशासनासमोर अनेक अडचणी निर्माण होतात.
-
ब्रिटनमध्ये १२ दशलक्ष श्वान युनायटेड किंग्डम (UK) मध्ये सुमारे १२ दशलक्ष श्वान आहेत. येथे पाळीव प्राणी ठेवण्याची आणि त्यांची काळजी घेण्याची संस्कृती खूप जुनी आणि मजबूत आहे.
-
रशियातील ‘मेट्रो डॉग्स’ प्रसिद्ध रशियामध्ये सुमारे १५ ते १७ दशलक्ष श्वान आहेत. येथील ‘मेट्रो डॉग्स’ म्हणजे सार्वजनिक वाहतूक वापरणारे श्वान जगभर प्रसिद्ध आहेत. या देशात श्वान हे शहराच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग बनले आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : पेक्सेल्स )
भारत श्वानप्रेमात मागे? सर्वाधिक श्वानसंख्या असलेल्या देशांत भारत कोणत्या क्रमांकावर?
अमेरिकेपासून रशियापर्यंत वाढती श्वानसंख्या; भारतातही वाढती पाळीव श्वानांची आवड पण भटक्या श्वानांची चिंता कायम
Web Title: Global dog population comparison top countries numbers trends and pet ownership growth svk 05