Delhi polls दिल्ली विधानसभेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. भाजपाने ४८ जागा मिळवत दिल्ली काबीज केली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या आप म्हणजे आम आदमी पार्टीकडे असलेली सत्ता खेचून आणली आहे. आता भाजपाचा मुख्यमंत्री कोण असेल? याची चर्चा रंगली आहे. अशातच एक महत्त्वाचं निरीक्षण समोर आलं आहे. महिलांची मतं आपकडे वळली तर पुरुषांची मतं भाजपाला मिळाली. त्यामुळे भाजपाचा विजय झाला असं एक निरीक्षण समोर आलं आहे. हे नेमकं कसं घडलं जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महिला आणि पुरुष मतदारांच्या मतांची विभागणी नेमकी कशी झाली?

दिल्ली विधानसभेसाठी ५ फेब्रुवारीला मतदान झालं. या दिवशी भाजपा एनडीएला मिळालेल्या पुरुष मतांचा विचार करणं महत्त्वाचं ठरतं. कारण एकूण पुरुष मतदारांपैकी ५१ टक्के पुरुष मतदारांनी भाजपा, एनडीएला मतदान केलं. त्यांची मतं निर्णायक ठरली. हे प्रमाण आपला पुरुष मतदारांनी दिलेल्या मतदारांपेक्षा १२ टक्के जास्त होतं. कारण आप पुरुष मतदारांची मिळालेली मतं ही अवघी ३९ टक्के होती. त्या तुलनेत भाजपाला १२ टक्के जास्त मतदान पुरुष मतदारांनी केलं. त्यामुळे या मतांचा महत्त्वाचा वाटा भाजपाच्या विजयात आहे. लोकनिती सीएसडीएसने केलेल्या सर्व्हेनुसार ही टक्केवारी समोर आली आहे. २०२० च्या तुलनेत भाजपाला मिळालेल्या पुरुष मतदारांचं मताधिक्य हे ८ टक्के वाढलं. असंही या अहवालात म्हटलं आहे. दरम्यान महिला मतदार या आपच्या बाजूने होत्या हे दिसून आलं. लोकनितीनी सीएसडीएसने याबाबतही अहवाल सादर केला आहे.

आप या पक्षाकडे महिलांची मतं कशी आणि का राहिली?

दरम्यान आप या पक्षाला महिलांची मतं मोठ्या प्रमाणावर मिळाली आहेत. अहवालानुसार आप या पक्षाला ४९ टक्के महिलांनी मतदान केलं. भाजपाच्या तुलनेत हे प्रमाण सहा टक्के जास्त होतं. कारण भाजपाला महिला मतदारांची ४३ टक्के मतं मिळाली. तर या अहवालानुसार ७ टक्के पुरुष मतदारांनी काँग्रेसला मतदान केलं. तर पाच टक्के महिला मतदारांनी काँग्रेसला मतदान केलं. २०२० च्या विधानसभा निवडणुकीत महिला आणि पुरुष मतदार यांचं काँग्रेसला झालेलं मतदान प्रत्येकी २ टक्के होतं. या वेळी काँग्रेसला किंचितसा फायदा झाला. मात्र त्यांना भोपळा फोडता आला नाही हे वास्तव आहे.

‘आप’कडे महिला मतं का जास्त प्रमाणात राहिली?

आप या पक्षाने दिल्ली निवडणुकीच्या तोंडावर बसचा प्रवास फुकट केला होता. तसंच महिन्याला २१०० रुपये देण्याची योजना सुरु केली होती. महिला सन्मान योजनेच्या अंतर्गत दिल्लीत या योजनेसाठी पात्र महिलांना दरमहा २१०० रुपये मिळत हते. भाजपाने महिला समृद्धी योजना जाहीर करत पात्र महिलांना महिना २५०० रुपये जाहीर केले. तसंच २१००० गरदोर महिलांना जाहीर केले. त्यामुळे महिलांची मतंही मागच्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपाला जास्त मिळाली मात्र आपला महिलांची मतं भाजपाच्या तुलनेत जास्त मिळाली. महिला आणि पुरुष मतदार यांचा कसा परिणाम या निवडणुकीवर झाला हे आपल्याला दिसून या अहवालावरुन समजतं आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi polls gender divide men fuel bjp surge aap retains edge among women scj