लातूर- जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे यांच्या नियुक्तीनंतर त्यांचे स्वागत उदयनराजे मित्र मंडळ समूहाच्या वतीने करण्यात आले. लातुरात गेल्या वर्षभरापासून श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूह कार्यरत आहे. रक्तदान शिबीर,नेत्र चिकित्सा शिबीर अशा सामाजिक उपक्रमातून आरोग्य क्षेत्रात गरजूंना मदत केली जाते. तरुण मंडळी यात सहभागी आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पालकमंत्री लातुरात येणार असल्याचे कळल्यानंतर शहरातल्या विविध भागांत त्यांच्या स्वागताचे फलक लावण्यात आले. पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनीही उदयनराजे मित्र समूहाच्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून त्यांच्या कामाबद्दल आस्थेने चौकशी केली. मित्र समूहाचे लातूरचे कार्यकर्ते रमेश गडगिळे, दर्शन घाडगे, रोहित कोते, राहुल गंगापुरे, सुमित शिंदे, समाधान धुमाळ या सर्वांबरोबर चर्चा करत आस्थेने चौकशी केली .या कार्यकर्त्यांनी लातूरच्या आरोग्य क्षेत्रातील प्रश्न सांगितले. जिल्हा रुग्णालयासारखा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लावण्याची विनंतीही पालकमंत्र्यांना केली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guardian minister shivendra singh raje welcomed by udayan raje mitra group print politics news ssb