रवींद्र जुनारकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे खंदे समर्थक भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा व महानगर अध्यक्ष राहुल पावडे यांनी ग्रामीण व महानगर पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी जाहीर केली. या कार्यकारिणीवर मुनगंटीवार गटाचे वर्चस्व असून माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर समर्थकांना डावलल्याचे दिसत आहे. यामुळे अहीर समर्थकांतून नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

दोन दिवसांपूर्वी जिल्हाध्यक्ष शर्मा यांनी कार्यकारिणी जाहिर केली. माजी महानगराध्यक्ष तथा मुनगंटीवारांचे कट्टर समर्थक डॉ. मंगेश गुलवाडे यांची जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. याचबरोबर संध्या गुरनुले, ब्रीजभूषण पाझारे, राजू गायकवाड, विवेक बोढे यांचीही सरचिटणीसपदी वर्णी लागली. वंदना शेंडे यांना महिला मोर्चा अध्यक्ष करण्यात आले. भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्षपदी महेश देवकते, युवा मोर्चा सरचिटणीसपदी श्रीनिवास जनगमवार, अमित गुंडावार, तनय देशकर आणि यश बांगडे यांची निवड करण्यात आली आहे. ओबीसी आघाडीच्या अध्यक्षपदी अहीर समर्थक डॉ. अंकुश आगलावे तर गौतम निमगडे हे अनुसूचित जाती आघाडीचे अध्यक्ष आहेत. अनुसूचित जमाती आघाडीच्या अध्यक्षपदाची धुरा अरुण मडावी यांच्याकडे आहे. इम्रान पठाण अल्पसंख्यांक आघाडी तर बंडु गौरकार हे किसान आघाडीचे अध्यक्ष असतील.

हेही वाचा… चावडी: अशोकपर्व

महानगर अध्यक्ष राहुल पावडे यांनी महानगर पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी जाहीर केली. महानगर महामंत्रीपदी प्रज्वलंत कडू, सुरज पेदुलवार, रामपाल सिंग, किरण बुटले, सविता कांबळे भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष, महामंत्रीपदी शिला चव्हाण, सुष्मा नागोसे, कल्पना बगुलकर, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष विशाल निंबाळकर, युवा मोर्चा महामंत्रीपदी सुनील डोंगरे, प्रमोद क्षिरसागर, क्रिष्णा चंदावार, गणेश रामगुंडेवार, सतिश तायडे, नरेंद्र बोपचे, ओबीसी आघाडीच्या अध्यक्षपदी मनोज पोतराजे, अनुसूचित जाती आघाडी अध्यक्ष धम्मप्रकाश भस्मे, अनुसूचित जमाती आघाडी अध्यक्ष धनराज कोवे तर चाँदभाई पाशा यांची अल्पसंख्यांक आघाडी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. महानगर मध्य मंडळ अध्यक्षपदी सचिन कोतपल्लीवार, दक्षिण मंडळ अध्यक्ष संदिप आगलावे, पूर्व मंडळ अध्यक्षपदी दिनकर सोमलकर, उत्तर मंडळ अध्यक्ष पुरुषोत्तम सहारे व पश्चिम मंडळ अध्यक्ष रवी लोणकर यांची निवड करण्यात आली आहे.

हेही वाचा… खानापूर-आटपाडीमध्ये सुहास बाबर निवडणुकीच्या रिंगणात ?

जिल्हा आणि शहर कार्यकारिणीत मुनगंटीवार गटाला झुकते माप दिल्यामुळे अहीर समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. उल्लेखनीय आहे की, यापूर्वीदेखील पदाधिकारी निवडीतही मुनगंटीवार गटाचेच वर्चस्व होते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In chandrapur district bjp executive declared dominated by sudhir mungantiwar over hansraj ahir group print politics news asj