पुणे : पालखी दर्शनासाठी गेलेला १३ वर्षीय मुलगा बेपत्ता

कैलास ब्रिजलाल गौतम (वय १३, रा. सोरतापवाडी, लाेणी काळभोर, पुणे-सोलापूर रस्ता) असे बेपत्ता झालेल्या मुलाचे नाव आहे.

13 years old goes missing after visiting wari palkhi
पालखी दर्शनासाठी गेलेला १३ वर्षीय मुलगा बेपत्ता

पुणे-सोलापूर रस्त्यावर सोरतापवाडी परिसरात पालखी दर्शनासाठी गेलेला १३ वर्षीय मुलगा बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे. कैलास ब्रिजलाल गौतम (वय १३, रा. सोरतापवाडी, लाेणी काळभोर, पुणे-सोलापूर रस्ता) असे बेपत्ता झालेल्या मुलाचे नाव आहे. त्याचे वडील ब्रिजलाल रामजानकी गौतम (वय ३९) यांनी यासंदर्भात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ब्रिजलाल गौतम मूळचे उत्तर प्रदेशातील आहेत. सोरतापवाडीतील एका रोपवाटिकेत ते कामाला आहे. ब्रिजलाल, पत्नी आणि मुलगा कैलास तेथे राहायला आहेत. २५ जून रोजी कैलास कडवस्ती परिसरात श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी गेला होता. त्यानंतर कैलास बेपत्ता झाला.

तो घरी न परतल्याने ब्रिजलाल आणि त्यांच्या पत्नीने कैलासचा शोध घेतला. गौतम दाम्पत्य त्याचा शोध घेण्यासाठी बारामतीपर्यंत गेले होते. मात्र, त्याचा ठावठिकाणा न लागल्याने त्यांनी पोलिसांकडे तो बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे यांनी सांगितले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 13 years old goes missing after visiting wari palkhi pune print news asj

Next Story
पुणे : वाढदिवस साजरा करणाऱ्या टोळक्याची दहशत
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी