गणेश विसर्जन मिरवणुकीत नाचताना एकाचा हृदयविकाराच्या झटक्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री नगर रस्त्यावरील वाघोली परिसरात घडली. गणेश बाळकृष्ण दळवी (वय ४४ , रा. उमंग होम प्राईम सोसायटी, वाघोली ) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. उमंग होम प्राईम सोसायटी गणेश मंडळचीमिरवणूक गुरुवारी सायंकाळी काढण्यात आली. सायंकाळी सातच्या सुमारात मिरवणूक नाचत असताना दळवी कोसळले. दळवींना वाघोली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. दळवी यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. लोणीकंद पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मित मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.