पुणे : कौटुंबिक वादातून २५ वर्षीय तरुणाची गोळी झाडून आत्महत्या

हडपसर मधील भागीरथी नगर येथील घटना

पुणे : कौटुंबिक वादातून २५ वर्षीय तरुणाची गोळी झाडून आत्महत्या
(संग्रहीत छायाचित्र)

पुण्यातील हडपसर भागात राहणाऱ्या २५ वर्षीय तुरूणाने कौटुंबिक वादातून स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशाल तोडकर(वय २५, रा. भागीरथी नगर, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपस येथील भागीरथी नगर येथे विशाल तोडकर हा पत्नी आणि आई सोबत राहत होता. त्याचे कपड्याचे दुकान आहे. मागील काही दिवसांपासून विशालचे घरात सतत वाद होत असायचे, त्यातून विशालने काल रात्री पावणे नऊच्या सुमारास स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली.

याशिवाय, एका तरुणी सोबत प्रेम संबध असल्याने कुटुंबियांसोबत त्याचे वाद होत होते. त्यातूनच विशालने आत्महत्या करण्याचे पाऊल उचल्याची देखील प्राथमिक माहिती मिळत आहे. नेमकं आत्महत्या करण्याचं कारण तपासातून पुढे येईल, तसेच त्याच्याकडे गावठी पिस्तूल कशी आली. याचा देखील तपास सुरू असल्याचे हडपसर पोलिसांनी सांगितले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A 25 year old youth committed suicide by shooting himself due to a family dispute msr 87 svk

Next Story
पुणे : पेट्रोल पंप एजन्सी मिळवून देण्याच्या आमिषाने ४२ लाखांची फसवणूक
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी