A case has been filed against the workers of Popular Front of India who protested in front of the Collector office | Loksatta

पुणे : ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देत आंदोलन करणाऱ्या पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केल्यामुळे पोलिसांनी पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या ४१ पदाधिकाऱ्यांना जणांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे.

पुणे : ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देत आंदोलन करणाऱ्या पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल
पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही आंदोलन करून घोषणाबाजी करणाऱ्या पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) कार्यकर्त्यांच्या विरोधात बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. एनआयएने कोंढवा भागात केलेल्या कारवाईविरोधात पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले होते.

हेही वाचा- पुणे शहरात लहान मुले पळविणारी टोळीची अफवा; खोटी माहिती पसरवणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

एनआयएच्या कारवाईचा निषेध

राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) गुरुवारी (२२ सप्टेंबर) कोंढवा भागात छापा टाकून पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांना अटक केली. एनआयएने देशातील विविध ठिकाणी केलेली कारवाई म्हणजे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा केंद्र सरकारचा डाव असल्याचा आरोप या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. या कारवाईच्या निषेधार्थ पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (२३ सप्टेंबर) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करण्यात आली.

हेही वाचा- पुणे : मोटारीची दुचाकीला धडक, बालिकेचा मृत्यू ; मोटारचालक संगणक अभियंता गजाआड

४१ जणांना ताब्यात घेत गुन्हा दाखल

पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली होती. परवानगी नाकारल्यानंतर पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी बेकायदा आंदोलन केले. जमाव जमवून घोषणाबाजी केली. बेकायदा आंदोलन करून घोषणाबाजी केल्याप्रकरणी ४१ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला, असे बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी सांगितले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
हृदयविकारावरील औषधाच्या नव्या स्फटिकरूपी संयुगाचा शोध; हैदराबाद विद्यापीठाचे संयुक्त संशोधन

संबंधित बातम्या

छेडछाडीला कंटाळून बारावीत शिकणाऱ्या युवतीची आत्महत्या; पाठलाग करणाऱ्या मुलांविरोधात गुन्हा दाखल
पुणे: निधी न देता शाळांमध्ये समता सप्ताह राबवण्याचे निर्देश
पुणे : राज्यपालांनी व्यक्त केला पश्चात्ताप…. शिष्टमंडळ भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा
पिंपरीत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अजितदादांचा दौरा अन् विकासकामांचा धडाका
Pune Municipal Corporation Seats Reservation draw 2016 : प्रभागातील ‘या’ जागा झाल्या आरक्षित

व्हिडिओ

ताज्या बातम्या
शेतकऱ्यांच्या मुलांना ड्रोन चालवण्याचं प्रशिक्षण दिलं जाणार; खरेदीसाठी सबसिडीही मिळणार – कृषीमंत्री अब्दुल सत्तार
“आता लवकरच…” लग्नानंतरची पाठकबाईंची ‘ती’ पोस्ट चर्चेत
सॅलेडमध्ये मीठ टाकण्याची सवय आहे का? यामुळे होऊ शकते आरोग्याचे नुकसान, लगेच जाणून घ्या
‘बाळासाहेबांची शिवसेने’चे उद्या पुण्यात शक्तीप्रदर्शन; खासदार श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत अन्य पक्षांतील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
ऐकावं ते नवलचं! १ कोटीचं पॅकेज तरिही ऑफिसमध्ये नाही काम, कर्मचाऱ्याने चक्क बॉसविरोधात कोर्टात दिली तक्रार