मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवलेनजिक असलेल्या वडगाव उड्डाणपुलाजवळ भरधाव ट्रकने धडक दिल्याने दुचाकीवरील सहप्रवासी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
ज्योत्स्ना सूर्यकांत वाघुले (वय ४०, रा. दिघी) असे मृत्युमुखी पडलेल्या सहप्रवासी महिलेचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार सूर्यकांत वाघुले (वय ४६) जखमी झाले आहेत. या प्रकरणी पसार झालेल्या ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूर्यकांत यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दुचाकीस्वार सूर्यकांत आणि त्यांची पत्नी ज्योत्स्ना मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरून निघाले होते. वडगाव उड्डाणपुलाजवळ भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या ज्योत्स्ना यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.
First published on: 31-01-2023 at 17:10 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A female passenger on a two wheeler died after being hit by a truck near navale bridge in pune pune print news rbk 25 ssb