पुणे : फॅटी लिव्हर रोगाचे निदान होईल लवकरात लवकर होणे आवश्यक असते. त्यामुळे वेळीच उपचार सुरू होऊ शकतात. या रोगाचे योग्य वेळी निदान न झाल्यास यकृताला अधिक इजा होऊन गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे अचानकपणे पचनाशी संबंधित समस्या उद्भवल्यास तत्काळ तज्ञांचा सल्ला घेऊन तपासणी करुन घ्यावी, असा सल्ला आरोग्यतज्ज्ञांनी दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जागतिक कावीळ दिनाच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांनी हा सल्ला दिला आहे. फॅटी लिव्हर आजार काविळीमुळेही होऊ शकतो. याचबरोबर इतरही कारणांनी तो होतो. त्याची लक्षणे रुग्णांनी वेळीच ओळखायला हवीत. वारंवार पोटदुखी, मळमळणे अथवा उलट्या होणे, भूक मंदावणे आणि कावीळ ही फॅटी लिव्हरची प्रमुख लक्षणे आहेत. गंभीर स्वरुपातील फॅटी लिव्हर आजाराशी संबंधित प्रमुख लक्षण म्हणजे वारंवार पोटात दुखणे. यकृतामध्ये अधिक प्रमाणात चरबी जमा होऊ लागते तसतशी यकृताला सूज येऊन ते वाढू लागते. त्यामुळे जवळपासचे अवयव आणि पोटावर ताण पडू लागतो. यामुळे पोटात दुखू लागते आणि पोटाच्या उजव्या बाजूला जड वाटू लागते.

हेही वाचा >>> पुणे मेट्रोला हिरवा कंदील! पंतप्रधान मोदींच्या हस्ते केवळ उद्घाटनाची औपचारिकता

हे दुखणे वाढू लागले लवकरात लवकर वैद्यकीय मदत घेऊन फॅटी लिव्हर आजार आहे की नाही याची तपासणी करावी. शरीरातील विषारी पदार्थांवर प्रक्रिया करुन ते बाहेर टाकून शरीराला विषमुक्त करण्यासाठी यकृत महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. यकृतावर चरबीमुळे अतिरिक्त ताण येऊ लागतो त्यावेळी यकृताच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ लागतो आणि शरीरात विषारी घटक साठायला लागतात. या विषारी घटकांमुळे मळमळणे आणि उलट्या होऊ लागतात कारण शरीर या घातक पदार्थांना बाहेर टाकण्याचा प्रयत्न करु लागते. त्यामुळे सातत्याने उलट्या किंवा मळमळ या गोष्टींकडे दुर्लक्ष करु नये.

हेही वाचा >>> पिंपरी-चिंचवडकरांची पायपीट थांबणार; गावांचा भूमी अभिलेख कार्यालयांतर्गत समावेश होणार

अतिशय गंभीर स्वरुपाच्या फॅटी लिव्हर मुळे शरीरातील पचनक्रियेमध्ये अडथळे निर्माण होतात. यामुळे भूक कमी होऊ लागते. यकृत हे पचन घडवण्यासाठी महत्त्वाचा घटक असलेले पित्त तयार करत असते. यकृतावर अधिक प्रमाणात चरबी जमा झाल्यास चरबी पचवण्याची क्षमता कमी होऊ लागते, त्यामुळे पोट भरलेले वाटणे, त्रास होणे आणि खाण्याची इच्छा नसणे अशा गोष्टी घडू लागतात. फॅटी लिव्हर रोगाच्या काही गंभीर प्रकरणांमध्ये कधीकधी कावीळही होऊ शकते. कावीळ होते ज्यावेळी रक्तातील लाल पेशींचे विभाजन होत असते. त्यावेळी बिलीरुबीन हे यकृत बाहेर काढू शकत नाही. त्यामुळे शरीरात जे अतिरिक्त बिलीरुबीन असते ते रक्तात मिसळायला सुरुवात होते, त्यामुळे त्वचा आणि डोळे पिवळे होऊ लागतात. अशा प्रकरणांमध्ये ताबडीने वैद्यकीय सल्ला घेण्याची आवश्यकता असते.

फॅटी लिव्हर या आजाराला स्टियोटोसिस असे म्हटले जाते. यकृतामध्ये अधिक प्रमाणात चरबी साठू लागते, त्यावेळी हा आजार होतो. हा चरबीचा अतिरेक घातक असतो आणि त्यामुळे आरोग्य विषयक समस्या निर्माण होऊ लागतात. पचनसंस्थेत यकृत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्यामुळे फॅटी लिव्हर आजाराचे गंभीर स्वरुप आधीच दिसून येते. – डॉ अमोल डहाळे, पोटविकार तज्ज्ञ, मणिपाल हॉस्पिटल, बाणेर

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Be careful pay attention to fatty liver symptoms pune print news stj 05 ysh