पुणे : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर पुणे महापालिकेच्या आवारात झालेल्या हल्ल्याप्रकरणी एकास सोमवारी अटक करण्यात आली. याप्रकरणात शिवसेनेच्या शहर प्रमुखांसह ६० ते ७० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सनी गवते असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. हल्ला प्रकरणात शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, पदाधिकारी चंदन साळुंके, किरण साळी, सूरज लोखंडे, रूपेश पवार, राजेंद्र िशदे, सनी गवते यांच्यासह ६० ते ७० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप कार्यकर्ते प्रशांत लाटे यांनी यासंदर्भात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दरम्यान हल्लेखोरांवर कारवाईच्या मागणीसाठी सोमय्या हे मंगळवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत.