पुणे : द चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियातर्फे  (आयसीएआय) सनदी लेखापाल (सीए) अभ्यासक्रमातील  इंटरमिडिएट (आयपीसी), इंटरमिडिएट (नवीन अभ्यासक्रम) परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला. आयपीसी परीक्षेत मुंबईच्या प्रीती कामतने देशात पहिला क्रमांक मिळवला.

आयसीएआयकडून जुलैमध्ये या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. आयपीसी परीक्षा देशभरातील ५९८ ‘केंद्रांवर घेण्यात आली. त्यात के वळ पहिल्या गटाची परीक्षा दिलेल्या ८ हजार ८७३ विद्यार्थ्यांपैकी ३८५ विद्यार्थी (४.३४ टक्के) उत्तीर्ण झाले. के वळ दुसऱ्या गटाची परीक्षा दिलेल्या २६ हजार ४१३ विद्यार्थ्यांपैकी ७ हजार ९५७ विद्यार्थी (३०.१३ टक्के) उत्तीर्ण झाले. तर दोन्ही गटांची परीक्षा दिलेल्या ३ हजार ७९८ विद्यार्थ्यांपैकी २५ विद्यार्थी (०.६६ टक्के) उत्तीर्ण झाले. इंटरमिडिएट (नवीन अभ्यासक्रम) परीक्षेत नवी दिल्लीच्या अर्जुन मेहराने देशात पहिला, महिन नाईमने दुसरा आणि बंगळुरूच्या सुदीप्ता बेन्याने तिसरा क्रमांक मिळवला.

देशभरातील ७४२ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेतील के वळ पहिल्या गटाची परीक्षा दिलेल्या ६० हजार ३३५ विद्यार्थ्यांपैकी १७ हजार ५६३ विद्यार्थी (२९.११ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले, के वळ दुसऱ्या गटाची परीक्षा दिलेल्या ४५ हजार ४२३ विद्यार्थ्यांपैकी १० हजार ८२ (२२.२ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर दोन्ही गटांची परीक्षा दिलेल्या २० हजार ६६८ विद्यार्थ्यांपैकी २ हजार १६९ (१०.४९ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले, अशी माहिती आयसीएआयच्या पुणे शाखेकडून प्रसिद्धिपत्रकाद्वारे देण्यात आली.