पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे (सीबीएसई) नाव, बोधचिन्ह वापरणारी तीस बनावट खाती एक्स या समाजमाध्यमावर असल्याचे निदर्शनास आले आहे. या खात्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून, अधिकृत माहितीसाठी केवळ अधिकृत खात्याचाच वापर करण्याचे आवाहन सीबीएसईकडून करण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – पुणे: मतदान यंत्रे चोरी प्रकरण तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना भोवले

हेही वाचा – पिंपरी: ‘इको पार्क’मधील वृक्षतोडीच्या निषेधार्थ पर्यावरणप्रेमींचे मुंडन आंदोलन

सीबीएसईने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. एक्स या समाजमाध्यमावरील काही खात्यांकडून सीबीएसईच्या नावाचा किंवा बोधचिन्हाचा वापर करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र ही खाती बनावट असल्याने नागरिकांची दिशाभूल होऊ शकते या पार्श्वभूमीवर सीबीएसईने या बनावट खात्यांबाबतची माहिती जाहीर केली. @cbseindia29 हेच सीबीएसईचे अधिकृत खाते असून, या खात्याद्वारे देण्यात येणारी माहिती अधिकृत असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच सीबीएसईचे नाव आणि बोधचिन्ह वापरून अन्य खात्यांकडून दिली जाणारी माहिती अधिकृत नाही, त्यासाठी सीबीएसई जबाबदार नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cbse will take action on fake accounts warns in clear words pune print news ccp 14 ssb