केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचा (सीटीईटी) निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेतील पेपर एकमध्ये ५ लाख ७९ हजार ८४४ उमेदवार आणि पेपर दोनमध्ये ३ लाख ७६ हजार २५ उमेदवार पात्र ठरले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- पुणे : वन कर्मचऱ्यांना मारहाण प्रकरणी दोघांना शिक्षा

सीबीएसईने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. २८ डिसेंबर ते ७ फेब्रवारी या कालावधीत देशभरातील केंद्रांवर सीटीईटी घेण्यात आली होती. त्यात पेपर एकसाठी नोंदणी केलेल्या १७ लाख ४ हजार २८२ उमेदवारांपैकी १४ लाख २२ हजार ९५९ उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यात ५ लाख ७९ हजार ८४४ उमेदवार पात्र ठरले. तर पेपर दोनसाठी नोंदणी केलेल्या १५ लाख ३९ हजार ४६४ उमेदवारांपैकी १२ लाख ७६ हजार ७१ उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यातील ३ लाख ७६ हजार २५ उमेदवार पात्र ठरले आहेत. परीक्षेचा निकाल https://ctet.nic.in आणि https://cbse.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उमेदवारांची गुणपत्रके आणि पात्रता प्रमाणपत्र डिजिलॉकरमध्ये लवकरच उपलब्ध करण्यात येतील, असे सीबीएसईने स्पष्ट केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ctet exam result declared pune print news ccp14 dpj