गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ ट्रस्ट मार्फत विसर्जन मिरवणुकीत दुपारी चार वाजता सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला होता.ठरलेल्या नियोजित वेळेनुसार दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मुख्य मंडपामधून मिरवणुकीला सुरुवात झाली.त्याच दरम्यान जोरदार पावसाने हजेरी लावली. तरी देखील त्याच उत्साहात विसर्जन मिरवणुक बेलबाग चौकातून लक्ष्मी रस्त्यावरून मिरवणुक पुढे मार्गस्थ झाली आणि ८ वाजून ५० वाजता गणपतीचे पांचाळेश्वर मंदिर घाटावर विसर्जन करण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> कोयता गँगचा बिमोड…गणेश विसर्जन मिरवणुकीत थेट देखावाच साकारला!

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३१ व्या वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक लक्ष्मी रस्त्याने श्री गणाधीश रथातून काढण्यात आली. विसर्जन मिरवणुकीसाठीचा श्री गणाधीश रथ हा भगवान श्रीगणेश आणि यंदाची सजावट असलेल्या अयोध्या श्रीराम मंदिर संकल्पनेला सुसंगत असा साकारण्यात आला होता. तसेच आकर्षक विद्युतरोषणाईने हा रथ उजळून निघाला. या मिरवणुकीत आरोग्य रथ अग्रभागी सहभागी झाला होता. दरवर्षीप्रमाणे यंदा सामाजिक विषयांतर्गत आरोग्यविषयक जनजागृती रथावरुन करण्यात आली. याखेरीज मिरवणुकीत प्रभात ब्रास बँड, दरबार ब्रास बँड, स्वरूप वर्धिनीचे ढोल लेझिम पथक,सनई चौघडा असा लवाजमा होता.तसेच पुरुष भाविकांसह महिला गणेशभक्त मोठया संख्येने सहभागी झाले होते.टिळक चौकामध्ये रात्री ८ : २० च्या सुमारास दगडूशेठ गणपतीचे आगमन झाले. त्यानंतर पांचाळेश्वर मंदिर घाट येथे रात्री ८ वाजून ५० मिनिटांनी विसर्जन झाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dagdusheth halwai ganpati immersion at panchaleshwar ghat with grand celebrations svk 88 zws