महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) अष्टविनायक यात्रा फार प्रसिद्ध आहे. मुंबईसह महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यामध्ये साजरा केला जातो. गणेश चतुर्थीला बाप्पाचे आगमन होते आणि दहा-अकरा दिवसांनंतर बाप्पा अनंत चतुर्दशी रोजी आपल्या गावी जायला निघतो. या काही दिवसांच्या कालावधीमध्ये भक्तजण रमून गणेशाचे सेवा, आराधना करतात. दीड, पाच दिवसांनी बाप्पाचे विसर्जन केले जाते. सार्वजनिक गणपती दहाव्या-अकराव्या दिवशी विसर्जित केले जातात. गणेश विसर्जनाच्या वेळी मुंबई पाहण्यासारखी असते. रस्त्यांवर दुतर्फा गर्दी असते.
पुण्यामध्ये मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी लोक येत असतात. महाराष्ट्रभर ही धूम पाहायला मिळते. कोकणामध्ये (Konkan) पारंपारिकरित्या नदीमध्ये विर्सजन केले जाते. या वर्षी बाप्पा १९ सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाची सुरुवात होणार असून २८ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. Read More
दोन वर्षानंतर यंदा उत्साहात झालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीच्या विलंबाची नैतिक जबाबदारी आम्ही स्वीकारत आहोत, अशी भावना मानाच्या गणपती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी…
यंदा निर्बंधमुक्त वातावरणात जल्लोषात गणेशोत्सव साजरा झाला. मात्र करोनापूर्वकाळातील सुमारे २,७६२ घरगुती, तर २,०६६ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदाही गणेशोत्सव साजरा…
अनंत चतुर्दशीला मोठ्या प्रमाणात होणारे गणेश विसर्जन निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवणाऱ्या पोलिसांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन संध्याकाळ पासून सुरू…
दहा दिवसांच्या बाप्पाला मोठ्या भक्तिभावाने निरोप दिल्यानंतर शनिवारी उरण पिरवाडी समुद्र किनारपट्टीवर जो केरकचरा निर्माण झाला होता तो मनसेच्या कार्यकर्त्यां…