पुण्याच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दत्ता धनकवडे यांची सोमवारी निवड झाली. महापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत धनकवडे यांना ८३ तर युतीचे उमेदवार योगेश टिळेकर यांना ४१ मते पडली. तर पुण्याच्या उपमहापौरपदी कॉंग्रेसचे नगरसवेक आबा बागूल यांची निवड झाली आहे, त्यांनी युतीचे भरत चौधरी यांचा पराभव केला.
पुण्याच्या महापौरपदावर गेली सलग १५ वर्षे आरक्षण होते. यंदा ते खुले झाल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तब्बल ११ नगरसेवक या पदासाठी इच्छुक होते. निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी ५४, कॉंग्रेस २९, महाराष्ट्र नवनिर्माण सेना २८, भारतीय जनता पक्ष २६, शिवसेना १५ असे पक्षीय बलाबल आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत मनसेने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली.
संग्रहित लेख, दिनांक 15th Sep 2014 रोजी प्रकाशित
पुण्याच्या महापौरपदी राष्ट्रवादीचे दत्तात्रय धनकवडे
पुण्याच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दत्ता धनकवडे यांची सोमवारी निवड झाली.

First published on: 15-09-2014 at 01:36 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Datta dhankawade elected as new mayor of pune municipal corporation