पिंपरी चिंचवडमधील विठ्ठल नगर भागात पुनर्वसन इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन खाली पडून एकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना रात्री ८ च्या सुमारास घडली आहे. मंडलिक आगाळे असे मृत्यू झालेल्या माणसाचे नाव आहे. ते दारुच्या नशेत सोमवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास इमारत क्रमांक १२ च्या पाचव्या मजल्यावरुन खाली पडले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मांडलिक आगाळे हे आपल्या बहिणीकडे आले होते. ते उस्मानाबादमध्ये वास्तव्य करत होते. मात्र पिंपरीत बहिणीच्या घरी आले असता त्यांचा इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन खाली पडून मृत्यू झाला. घरात कोणीही नसताना ही घटना घडली आहे. त्यामुळे आगाळे यांनी आत्महत्या केली आहे? की दारुच्या नशेत ते खाली कोसळले आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मंडलिक आगाळे यांच्या वडिलांवर यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी आता पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Death of one after falling from the fifth floor of the building