बंडखोर राहुल कलाटे यांचे चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत डिपॉझिट जप्त झाले आहे. निवडणुकीपूर्वी “एक लाख १२ हजारांचे जनमत माझ्या पाठीशी आहे, मी जनतेच्या मनातील आमदार आहे “, असा दावा करणाऱ्या राहुल कलाटेंना डिपॉझिटही राखता आले नाही. राहुल कलाटे यांना ४४ हजार ११२ मते मिळाली असून, डिपॉझिट राखण्यासाठी ४७ हजार ८३३ मते मिळणे आवश्यक होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष होते. भाजपाच्या अश्विनी लक्ष्मण जगताप या ३६ हजारांपेक्षा अधिक मताधिक्याने विजयी झाल्या. भाजपाच्या अश्विनी लक्ष्मण जगताप, महाविकास आघाडीचे नाना काटे आणि बंडखोर राहुल कलाटे अशी तिरंगी लढत पाहायला मिळाली. राहुल कलाटेंच्या बंडखोरीचा फायदा हा भाजपाच्या अश्विनी लक्ष्मण जगताप यांना झाला असल्याची चर्चा आहे, तशी वक्तव्ये महाविकास आघाडीचे नेते करत आहेत. भाजपाच्या अश्विनी लक्ष्मण जगताप या विजयी झाल्या असल्या तरी चर्चा मात्र बंडखोर राहुल कलाटेंची आहे.

हेही वाचा – रवींद्र धंगेकरांनी भाजपा खासदार गिरीश बापट यांची घेतली भेट

हेही वाचा – महापालिका निवडणुकीत चिंचवडमध्ये भाजपसमोर आव्हान

चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीच्या रिंगणात २८ उमेदवार उतरले होते. यापैकी केवळ भाजपाच्या अश्विनी लक्ष्मण जगताप आणि राष्ट्रवादीचे नाना काटे या व्यतिरिक्त कोणालाही डिपॉझिट राखण्यात यश आले नाही.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deposit of chinchwad byelection rebel candidate rahul kalate has been seized kjp 91 ssb