बारामती: महिला शासकीय ग्रामीण रुग्णालय येथे जिल्हास्तरीय कर्करोग तपासणी व जनजागृती मोहिमेचा शुभारंभ तसेच कर्करोग मोबाईल वाहन व डिजिटल हेंडहेड एक्सरे यंत्राचे खासदार सूनेत्रा पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागनाथ यमपल्ले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचीन देसाई, वैद्यकीय अधीक्षक डॉ.बापू भोई, डॉ.महेश जगताप, तालुका आरोग्य अधिकारी, डॉ.मनोज खोमणे, वैद्यकीय अधिकारी, व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या वाहनात कोल्पोस्कोप,पॅप सिमीयर, डेंटल चेयर, सर्वायकल बायोस्पी, ओरल मुकोसा बायोस्पी अशी अत्याधुनिक  उपकरणे आहेत. याद्वारे जिल्ह्यातील कर्करोगाची लक्षणे असलेल्या महिलांचे स्तन, मुख आणि गर्भाशय कर्करोगाची चाचणी ११ मार्च २०२५ पर्यंत करण्यात येणार आहे. महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे डॉ. यमपल्ले यांनी केले आहे. यावेळी महिला शासकीय ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भोई यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: District level cancer screening and awareness campaign launched from baramati pune print news snj 31 amy