ज्येष्ठ समाजसेवक डॅा. प्रकाश आमटे यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. डॅा. आमटे हे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या दीक्षांत समारंभासाठी पुण्यात आले असता त्यांना ताप आणि खोकल्याचा त्रास जाणवला. म्हणून त्यांना  दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये  दाखल करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजाराचे निदान करण्यासाठी तपासण्या आणि उपचार सुरु असून उपचारांना ते प्रतिसादही देत आहेत. सध्या डॅाक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आहे. डॅा. आमटे यांचे चिरंजीव अनिकेत आमटे यांनी समाज माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे.

सध्या न्युमोनियावर उपचार सुरु आहेत. शिवाय, इतर काही तपासण्यांमधुन ल्युकेमियाची (रक्ताच्या कर्करोगाची) सुरुवात असल्याचे लक्षात आले आहे. मात्र डॅा. आमटे यांची प्रकृती उत्तम असून ते उपचारांना ते चांगला प्रतिसाद देत असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले आहे.

“डॉक्टर प्रकाश आमटे हे ८ जून रोजी पुणे येथे बीजे मेडिकल कॉलेजमध्ये दीक्षांत समारंभाला आले असता त्यांना जास्त ताप व खोकल्याचा त्रास झाला म्हणून एका खासगी रुग्णालयात उपचार व तपासण्या सुरू आहेत व पूर्ण विश्रांतीचा डॉक्टरांनी सल्ला दिला आहे. आज उपचाराला थोडा प्रतिसाद मिळाला आहे. कदाचित ‘Lukemia’ ची शक्यता आहे. त्या साठी पुढील तपासण्या सुरू आहेत. सर्वांना नम्र विनंती आहे की सध्या त्यांना फोन/मेसेज करू नये. भेटायला येऊ नये. लवकरच ते ठणठणीत बरे होतील यासाठी आपण सर्व प्रार्थना करूया. अधिक माहिती नितीन पवार देतील,” असं अनिकेत आमटे यांनी फेसबुक पोस्टद्वारे कळवलं आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr prakash amte admitted to a private hospital in pune due to health problems msr
First published on: 13-06-2022 at 21:11 IST