उन्हातान्हाची तमा न बाळगता राज्याच्या ग्रामीण भागात आरोग्य सेवा पुरवणाऱ्या आशासेविका आरोग्यदूत म्हणून काम करतात. त्या सेविकांना हजार-दोन हजार रुपये वाढवून द्यायचे म्हटले, तरी सरकार मागे पुढे पाहते हे खेदजनक आहे, अशा शब्दांत डॉ. सावंत यांनी सरकारला घरचा आहेर दिला

पुण्यातील एका कार्यक्रमात डॉ. तानाजी सावंत बोलत होते. सावंत यांनी आशा सेविकांच्या मानधनवाढीच्या मुद्द्यावरून सरकारला घरचा आहेर दिला. डॉ. सावंत म्हणाले, की आशा सेविकांना पैसे दिल्यास सरकारच्या पोटात दुखते काय, हे बोलायला मी कोणालाही घाबरत नाही. मी खेडेगावातून आलेला माणूस आहे, जे वास्तव आहे ते मांडत असल्याचेही त्यांनी नमूद केले.