पुणे : रेल्वे गाडीतून सुरू असलेली गांजाची तस्करी पुणे रेल्वे स्थानकावर पकडण्यात आली. गाडीतून ३२ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कामगिरी रेल्वे सुरक्षा दलाच्या द्रोणा या श्वानाने केली आहे.भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्स्प्रेस पुणे स्थानकावर आल्यानंतर तिची तपासणी करण्यात आली. रेल्वे सुरक्षा दलाचे पथक द्रोणा श्वानासोबत स्थानकावर गाडीची नियमित तपासणी करीत होते. गाडीतील सामान्य श्रेणीच्या डबा तपासत असताना डब्यात एक ट्रॉली बॅग आढळली. त्या बॅगेजवळ कोणी नव्हते. ट्रॉलीचा वास श्वान द्रोणाने घेतल्यावर त्यात काही संशयास्पद वस्तू असल्याचा इशारा त्याने हँडलर जवानाला केला. रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने तपासणी केली असता बॅगेमध्ये ३२ किलो गांजा आढळला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हा जप्त केलेला गांजा लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून, पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अमली पदार्थ कारवाया प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. श्वान द्रोणा काही दिवसांपूर्वीच आणखी एका गाडीतून सुमारे दोन किलो अमली पदार्थ पकडण्यास मदत केली होती. विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे आणि वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त उदयसिंह पवार यांनी या कामगिरीबद्दल रेल्वे सुरक्षा दलाच्या श्वान पथकातील जवानांचे अभिनंदन केले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drona dog caught the smuggling of ganja in railways pune print news stj 05 amy