शरीरसौष्ठवासाठी बेकायदा इंजेक्शनची विक्री करणाऱ्या एका ओैषध विक्रेत्याला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. कोंढवा परिसरात ही कारवाई करण्यात आली. ओैषध विक्रेत्याने बेकायदा गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री केल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणी मंगेश पोपट नरुटे (वय ३३, रा. नऱ्हे, आंबेगाव) यांना अटक करण्यात आली. नरुटे यांचे कोंढवा परिसरातील उंड्री येथे संगम मेडीकल अँड लॅब ओैषध विक्री दुकान आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पुणे : पिस्तूल विक्री प्रकरणात सिंहगड रस्त्यावर एकास पकडले

नरुटे शरीरसौष्ठवासाठी बेकायदा इंजेक्शनची विक्री करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. बनावट ग्राहकाच्या माध्यमातून पोलीस आणि अन्न,ओैषध विभागाच्या (एफडीए) पथकाने शहानिशा केली. त्यानंतर नरुटे यांच्या ओैषध विक्री दुकानावर छापा टाकून मेफेनटरमाइन सल्फेट इंजेक्शनच्या आठ बाटल्या तसेच गर्भपाताच्या गोळ्यांची सात पाकिटे जप्त केली. ही ओैषधे त्याने कोणाकडून खरेदी केली. याबाबतचे खरेदी बिल मिळाले नाही. पोलीस उपनिरीक्षक वगरे तपास करत आहेत. अनेकजण झटपट शरीर कमाविण्यासाठी बेकायदा इंजेक्शनचा वापर करतात. शरीरसौष्ठवपटूंना बेकायदा मेफनटरमाइन सल्फेट इंजेक्शनची विक्री केली जाते. इंजेक्शन घेतल्याने दुष्परिणाम होण्याची शक्यता असते, असे सांगण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drug dealer arrested for sale of illegal injections for bodybuilding pune print news rbk 25 zws