पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून अद्याप मृत व्यक्तींची ओळख पटलेली नाही. सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास शिरगाव पोलिसांच्या हद्दीत हा अपघात घडला आहे. मोटारीचा टायर फुटल्याने अपघात झाल्याचं पोलिसांनी सांगितले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर मोटारीचा भीषण अपघात झाला असून त्यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. भरधाव मोटार मुंबईहून पुण्याचे दिशेने येत होती. तेव्हा, टायर फुटून मोटार द्रुतगती मार्गालगत उभ्या असलेल्या ट्रक ला जाऊन धडकली. या भीषण अपघातात जागीच चार जणांचा मृत्यू झाला आहे. अद्याप मृतांची ओळख पटलेली नाही. अपघात अत्यंत भीषण असल्याने मोटारीचा समोरील भाग चक्काचूर झालेला आहे. गेल्याच आठवड्यात मोटारीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पुणे- मुंबई द्रुतगती मार्ग हा सध्या मृत्यूचा सापळा बनला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fatal accident on pune mumbai expressway due to car tire burst amy