खेड शिवापूर टोलनाक्यावर टोलच्या वादातून एका मोटारचालकाने मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास एका कर्मचाऱयास गोळ्या घातल्या. सुरेश बाळू खोमणे (वय २५, रा. धांगवडी, ता. भोर) असे जखमी झालेल्या कर्मचाऱयाचे नाव आहे. त्याला उपचारांसाठी भारती विद्यापीठ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती गंभीर आहे.
गोळीबारानंतर संबंधित मोटार टोलनाक्यावरून पुण्याच्या दिशेने गेली. पोलीसांनी काहीवेळ गाडीचा पाठलाग केला. पण कात्रज डेअरीजवळून ती गाडी पोलीसांना चकमा देऊन पसार झाली.