लग्न जमवताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी पूजा:अर्चा करावी लागेल, असे सांगून चिखलीतील एका ३६ वर्षीय महिलेची १२ लाख रूपयांची फसवणूक करण्याचा प्रकार उघड झाला आहे. विशाल शर्मा (रा. जोहारीपूर, उत्तराखंड) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीविषयी संपूर्ण माहिती उपलब्ध नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>पिंपरीः एसकेएफ कंपनीच्या उपव्यवस्थापकाला ४८ लाखांच्या अपहार प्रकरणी अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखलीतील एका महिलेने वधू-वर सूचक मंडळात नावनोंदणी केली होती. आरोपीने तेथून तिचा मोबाइल क्रमांक मिळवला व तिच्याशी संपर्क साधला. लग्न जमविताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी पूजाअर्चा करावी लागेल, असे सांगून आरोपीने संबंधित महिलेकडून वेळोवेळी १२ लाख १७ हजार रूपये उकळले. याप्रकरणी फसवणूक झाल्याची तक्रार महिलेने चिखली पोलिसांकडे दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक कुदळे पुढील तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fraud of a woman in the name of performing rituals to arrange marriage pune print news amy