पुणे : घरखर्चास पैसे न दिल्याने पत्नीने पतीवर चाकूने वार केल्याची घटना कोंढवा परिसरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी पत्नीच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पतीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इम्रान खान (वय ४६, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) असे जखमी झालेल्या पतीचे नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – पुणे: राष्ट्रवादी सरपंचाच्या हत्येप्रकरणी चार संशयित ताब्यात

हेही वाचा – फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर फुटबाॅल सामनादरम्यान हाणामारी; १३ जणांविरुद्ध गुन्हा

या प्रकरणी इम्रानची पत्नी नाझनीनविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इम्रानचे वडील उस्मान (वय ७१) यांनी या संदर्भात कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रमजान महिना सुरू असल्याने नाझनीनने इम्रानला घरखर्चास पैसे मागितले होते. इम्रानने पैसे देण्यास नकार दिल्याने नाझनीन आणि इम्रान यांच्यात वाद झाला. रागाच्या भरात नाझनीने स्वयंपाकघरातील चाकुने इम्रानवर वार केले. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक वगरे तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Husband stabbed by wife for not paying house expenses in kondhwa pune print news rbk 25 ssb