पिंपरी – चिंचवड : फ्लिपकार्टच्या हबमधून मोबाईल चोरणाऱ्या दोन डिलिव्हरी बॉयला अटक करण्यात वाकड पोलिसांना यश आले आहे. आरोपींकडून सहा लाखांचे २४ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. आशिष भाऊसाहेब भोसले, पियुष गोविंद मोहिते यांसह एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फ्लिपकार्टचा दिवाळी आणि दसऱ्यापूर्वी ‘बिग बिलियन डे’ हा सेल असतो आणि या सेलच्या दरम्यान या डिलिव्हरी बॉयने २४ मोबाईल लंपास केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : अबब! तब्बल सात कोटींचा अश्व; पशू प्रेमींची पाहण्यासाठी झुंबड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्लिपकार्टच्या हबमधून मोबाईल चोरी करणाऱ्या दोन डिलिव्हरी बॉयला अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. फ्लिपकार्टच्या हबमधील मॅनेजरच्या तक्रारीवरून कामगारांनी ९ लाख ४७ हजारांचे ३८ मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार केली होती. वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला. दसरा आणि दिवाळीच्या अगोदर फ्लिपकार्टमध्ये ‘बिग बिलियन डे’ हा सेल असतो, त्या काळात ग्राहकांच्या खरेदीचे प्रमाण वाढलेले होते. फ्लिपकार्टच्या हबमध्ये मोठ्या प्रमाणावर वस्तूंची आवक-जावक वाढली होती. त्याचा फायदा घेऊन डिलिव्हरी बॉय आशिष भाऊसाहेब भोसले, पियुष गोविंद मोहिते यांसह अल्पवयीन मुलाने सहा लाखांचे २४ मोबाईल फोन लंपास केले होते. अखेर त्यांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. हि कामगिरी वाकड पोलिसांनी केली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pimpri chinchwad flipkart delivery boy who steals mobile phone arrested by the police kjp 91 css