पिंपरी : शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन ६ व ७ जानेवारी २०२४ रोजी उद्योगनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाची लगबग सुरू झाली असून मोरया गोसावी क्रीडा संकुल वर या तयारीने वेग घेतल्याचे दिसते. अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या वाटचालीतील हे शतकी संमेलन असल्याने या संमेलनाला विशेष महत्व आहे. राज्यभरात या नाट्य संमेलनाचे कार्यक्रम घेतले जाणार आहेत. आठवड्याभरावर येवून ठेपलेल्या या नाट्य संमेलनाच्या मुख्य सभामंडपाचे काम मोरया गोसावी क्रीडा संकुलवर जोरदार तयारी सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्य सभामंडपांतील काम ५० टक्के पूर्ण झाले असून १ जानेवारीपर्यंत संमेलन स्थळांवरील संपूर्ण काम पूर्ण होईल, असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे. मुख्य सभामंडप हा ६० बाय ८० फूट इतके मोठे बांधण्यात आला आहे. तसेच लहान मुलांच्या कार्यक्रमासाठी भव्य  बालमंच देखील उभारण्यात येत आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर म्हणाले, नाट्य संमेलनाच्या तयारीने आता वेग घेतला आहे.

हेही वाचा : पिंपरी : वाकडमधील ‘टीडीआर’बाबत महापालिका आयुक्तांचे मोठे विधान, म्हणाले…

मुख्य सभामंडप आणि बालमंच याशिवाय शहरातील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह (चिंचवड), निळू फुले नाट्यगृह (सांगवी), गदिमा नाट्यगृह (प्राधिकरण), अंकुशराव लांडगे नाट्यगृह (भोसरी) अशा सहा  ठिकाणी शंभराव्या व्या संमेलनामध्ये रंगभूमीवर गाजलेली व्यवसायिक नाटके, बालनाट्य, उल्लेखनीय एकांकिका, प्रायोगिक नाटके, संगीत रजनी, संगीत नाटक यांसह ६४ विविध सांस्कृतिक व नाट्य विषयक कार्यक्रम व नाटकांचे सादरीकरण होणार आहे.

हेही वाचा : पिंपरी-चिंचवडकरांची कचरा सेवा शुल्कातून सुटका; प्रशासनाने घेतला ‘हा’ निर्णय

महापालिका सर्व सोयी-सुविधा पुरविणार

संमेलन यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयातून काम करावे. आवश्यक त्या सोयी सुविधांची पूर्तता करावी. संमेलनात नागरिकांचा सहभाग वाढविण्यावर भर द्यावा, अशा सूचना आयुक्त शेखर सिंह यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. महापालिकेच्या सभागृहांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून संमेलनात उपस्थित रसिक तसेच कलाकारांसाठी योग्य त्या सोयी सुविधांची उपलब्धता करून देण्यात येणार आहे. या संमेलनाचा उद्घाटन सोहळा ज्या ठिकाणी पार पडणार आहे. त्या ठिकाणी देखील आवश्यक सोयी सुविधा महापालिका पुरविणार आहे. या सर्व कामकाजाचा आढावा आणि नियोजनाबाबत आयुक्त सिंह यांनी माहिती घेतली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pimpri chinchwad preparation of 100 th all india marathi natya sammelan pune print news ggy 03 css