पुणे : घरकाम करण्याच्या बहाण्याने चोरी करणाऱ्या महिलेला चंदननगर पोलिसांनी अटक केली. महिलेकडून साेन्याचे दागिने, रोकड, तसेच दुचाकी जप्त करण्यात आली. महिलेकडून चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. ऋतुजा राजेश सुरुशे (रा. ॲसेम्ब्ली चर्चजवळ, वडगाव शेरी) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत वडगाव शेरी भागातील एका महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तक्रारदार ५२ वर्षीय महिला १७ फेब्रुवारी छत्रपती संभाजीनगर येथे कामानिमित्त गेल्या होत्या. त्या २५ फेब्रुवारी रोजी गावाहून परतल्या. त्या वेळी घरातील कपाटातून २७ ग्रॅेम सोन्याचे दागिने आणि रोकड चोरून नेण्यात आल्याचे उघडकीस आले होते. महिलेने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासात तक्रारदार महिलेच्या घरात काम करणारी महिला ऋतुजा सुरुशे हिने चोरी केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. तिच्या घरातून ७७ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि साडेपाच हजारांची रोकड जप्त करण्यात आली. चौकशीत सुरुशेने जुन्या मुंढवा रस्त्यावरील एका महिलेच्या घरातून ६० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रोकड चोरून नेल्याचे उघडकीस आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी तिला अटक केली. पोलिसांनी तिच्याकडून सोन्याचे दागिने, रोकड, दुचाकी जप्त केली. पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली चंदननगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे, सहायक निरीक्षक प्रशांत माने, उपनिरीक्षक अश्विनी पाटील, उपनिरीक्षक लक्ष्मण नवघणे, पोलीस कर्मचारी कळसाईत, गिरमे, काकडे यांनी ही कामगिरी केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune housekeeper woman arrested for theft of jewellery and cash pune print news rbk 25 css