पुण्यातील हडपसर भागात एका तरुणी सोबत सोशल मीडियावर ( फेसबुक) ओळख झाली. त्या तरुणीला बोलवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. (पंकज रामनाथ उदावंत वय ३७,मांजरी, हडपसर) या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर येथील आरोपी पंकज रामनाथ उदावंत याने सोशल मीडियावरील फेसबुकवर ३४ वर्षीय महिलेस फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. यातून दोघांमध्ये ओळख झाली. त्या दोघांमध्ये अनेक वेळ बोलणे होते. त्याच दरम्यान आरोपीने पीडित महिलेचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर पीडित महिलेस एप्रिल २०१८ मध्ये हडपसर येथे बोलवले. तो तिला त्याच्या बहिणीच्या घरी घेऊन गेला. तिथे तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली. तेथील फोटो आणि व्हिडिओ त्यावेळी आरोपीने रेकॉर्ड केले होते.
हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन वेळोवेळी पीडित महिलेवर अनेक वेळा अत्याचार केल्याची घटना घडली. त्यानंतर रेकॉर्ड केलेले व्हिडिओ आणि फोटो फिर्यादीच्या भावाला एका व्यक्तीला शेअर केले. या प्रकारानंतर अखेर पीडित महिलेने आरोपीच्या विरोधात तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपीला अटक करण्यात आली असून अधिक तपास करण्यात येत असल्याचे हडपसर पोलिसांनी सांगितले.
