पुणे : स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष आणि प्रजासत्ताक दिन असा दुहेरी योग साधून शीतल महाजन हिने हडपसर येथील ग्लायिडग सेंटर येथे पॅरामोटरच्या साहाय्याने पाच  हजार फुटांवरून नऊवारी साडी परिधान करून पॅराजिम्पग केले. अशाप्रकारे नऊवारी साडी परिधान करून पॅराजम्प करणारी ती पहिलीच भारतीय महिला असून हा तिचा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित झाला आहे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शीतल महाजन म्हणाली, सर्वसामान्य कुटुंबातून स्कायडायिव्हग खेळात (पॅराशूट जिम्पग) पुढे येत आंतरराष्ट्रीय स्तरावरील वेगवेगळय़ा स्पर्धेत मी सहभागी झालेली आहे. आतापर्यंत माझ्या नावावर १८ राष्ट्रीय आणि सहा जागतिक विक्रम प्रस्थापित आहेत. जगातील सात खंडात स्कायडायव्हिंग करणारी मी पहिली भारतीय महिला आहे. याची दखल घेत फेडरेशन ऑफ एरोनॉटिकल इंटरनॅशनल यांनी माझा सबिहा गोकसेन सुवर्ण पदक देऊन सन्मान केला आहे.

आतापर्यंत साडी घालून मी भारताबाहेर अनेक ठिकाणी स्कायडायिव्हग केले परंतु, जन्मभूमी असलेल्या पुणे शहरात नऊवारी साडी घालून पॅरामोटारमधून पॅराजिम्पग केल्याने ही विशेष पॅराजम्प माझ्यासाठी अविस्मरणीय ठरली आहे.

रॉन मेनेज यांच्या पॅरामोटारमधून आम्ही जमिनीपासून आकाशात सहा हजार फुटांवर गेलो. त्या ठिकाणी पॅरामोटारमधून मी बाहेर पडत आकाशात पक्ष्यासारखी झेप घेतली. जमिनीच्या दिशेने मी वेगात येत असतानाच साडेतीन हजार फूट उंचीवर मी पॅराशूट उघडले. अशाप्रकारे पॅरामोटारमधून पॅराशूट झेप घेणारी मी पहिली भारतीय महिला ठरली आहे. या उपक्रमासाठी ग्लायिडग सेंटरचे अधिकारी शैलेश चारभे यांचे विशेष सहकार्य लाभले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian skydiver shital mahajan jumps from 5000 feet in saree set new record zws