छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनाच्या औचित्याने किल्ले शिवनेरी येथे १८ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत हिंदवी स्वराज्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. त्यात १९ फेब्रुवारीला महाशिव आरती आयोजित करण्यात आली असून, या कार्यक्रमासाठी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना शिवनेरी येथे पाठवण्याच्या सूचना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- पुणे : शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे (एनएसएस) संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी या संदर्भातील परिपत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. पर्यटन संचालनालय आणि जिल्हा प्रशासनातर्फे हिंदवी स्वराज्य महोत्सव होणार आहे. त्यात हजारो लोकांच्या साक्षीने महाशिव आरती करण्याचे प्रस्तावित आहे. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील इच्छुक विद्यार्थ्यांना स्वयंसेवक म्हणून शिवनेरी येथे पाठवावे. विद्यार्थ्यांसह महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा कार्यक्रम अधिकाऱ्यांनीही उपस्थित राहण्याबाबत नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा- पुणे : खासदार गिरीश बापट प्रचारात सक्रिय, केसरीवाड्यात कार्यकर्ता मेळावा

कार्यक्रमाला येणारे विद्यार्थी आणि कार्यक्रम अधिकारी यांचा प्रवास आणि खानपानाची व्यवस्था विभागीय पर्यटन संचालनालयाद्वारे करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणारे विद्यार्थी आणि कार्यक्रम अधिकारी यांच्या नावाची यादी संपर्क क्रमांकासह nss_student_list@pun.unipune.acin या ई- मेलवर पाठवण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Instructions to university colleges to send nss volunteers for maha shiva aarti on shivneri pune print news ccp14 dpj