पुणे : दिवाळीत एसटी स्थानकाच्या आवारात चोरट्यांचा सुळसुळाट झाला. स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात प्रवासी महिलेच्या पिशवीतून दोन लाख २० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत एकाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार लोणी काळभोर भागात कामानिमित्त स्थायिक झाले आहेत. दिवाळीत तक्रारदार, त्याची पत्नी आणि मुले मूळगावी निघाले होते. एसटी स्थानकात गर्दी होती. बार्शीला जाणाऱ्या एसटी बसमध्ये प्रवेश करताना तक्रारदाराच्या पत्नीच्या पिशवीतून दोन लाख २० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरुन नेले. पोलीस उपनिरीक्षक शिरसट तपास करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> अबब! ५५ हजार…

स्वारगेट एसटी स्थानकात ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील एक लाख रुपयांची सोनसाखळी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली, तसेच छत्रपती संभाजीनगर परिसरातून पुण्याकडे येणाऱ्या एसटी प्रवासी महिलेच्या पिशवीतून ८८ हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली. शिवाजीनगर परिसरातील एसटी स्थानकाच्या आवारातून प्रवासी महिलेच्या पिशवीतून साडेतीन लाख रुपयांचे दागिने चोरून नेण्यात आल्याची घटना घडली होती. दिवाळीत एसटी स्थानकांच्या परिसरात गर्दी असते. शहरात वास्तव्यास असणारे विद्यार्थी, नोकरदार गावी जातात. दिवाळीत एसटी स्थानकाच्या आवारात ऐवज चोरीला जाण्याच्या घटना वाढीस लागतात. एसटी स्थानकाच्या आवारात पोलिसांचा वावर नसतो. एसटी स्थानकाची सुरक्षा वाऱ्यावर असल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jewellery worth two lakh stolen from woman at swargate st bus depot pune print news zws rbk 25 zws