पुणे : सदनिकेत शिरलेल्या चोरट्यांनी पाच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना कोथरूड भागातील एका सोसायटीत घडली. याप्रकरणी चोरट्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याबाबत एका महिलेने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला कोथरूड भागातील परांजपे शाळेजवळ असलेल्या ऋतुरंग सोसायटीत राहायला आहेत. सदनिकेत शिरलेल्या चोरट्यांनी कपाटातून पाच लाख रुपयांचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. सदनिकेत चोरी करणारा चोरटा माहितगार असल्यचाा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस उपनिरीक्षक बसवराज माळी तपास करत आहेत.

वानवडीत घरफोडी

दरम्यान, वानवडी भागातील एका सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी साडेतीन लाख रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एकाने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार वानवडीतील एका वसाहतीत राहायला आहेत. ७ मार्च रोजी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास तक्रारदार तरुण कुटुंबीयासंह बाहेर गेला होता. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून कपाटातील तीन लाख ६४ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. अर्ध्या तासाने ते घरी परतले. तेव्हा सदनिकेचे कुलूप तोडून कपाटातील दागिने चोरीला गेल्याचा प्रकार उघडकी आला. पोलीस उपनिरीक्षक चमन शेख तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jewelry worth five lakhs stolen from a flat in kothrud area pune print news rbk 25 amy