श्वानाच्या पिलाला चप्पलेने मारहाण केल्या प्रकरणी एकाच्या विरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्राणीमित्र संस्थेच्या कार्यकर्त्या महिलेने श्वान मारहाणीची ध्वनीचित्रफीत पाहिल्यानंतर या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जुनैद शेख (रा. उंड्री) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत मिशन पॉसीबल या संस्थेच्या पद्मिनी पीटर स्टंप (वय ६५, रा. गुरुनानकनगर, शंकरशेठ रस्ता) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा >>> पुणे जिल्हा परिषदेतर्फे कमवा आणि शिका योजना, जाणून घ्या मानधन किती मिळणार

शेख यांच्या विरुद्ध प्राण्यांना क्रुरतेने वागणूक दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख यांनी त्याच्या घरातील गॅलरीत चार महिन्याच्या सायबेरियन हस्की जातीच्या श्वानाला चप्पल तसेच लाथेने मारहाण केल्याची ध्वनीचित्रफीत समाजमाध्यमात प्रसारित झाली होती. मिशन पाॅसिबल या प्राणीमित्र संस्थेच्या पद्मिनी स्टंप यांनी ध्वनीचित्रफीत पाहिली. ध्वनीचित्रफितीत शेख त्यांच्या पाळीव श्वानाला मारहाण करत असल्याचे दिसून आल्यानंतर स्टंप यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक विजय वगरे तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kondhwa police registered a case against man for beating puppy with shoes pune print news rbk 25 zws