कामशेत बोगद्याच्या तोंडाशी दरड कोसळली पुणे- मुंबई एक्सप्रेस- वेवर पुन्हा दरड कोसळल्याची घटना घडली आहे. कामशेत बोगदयाजवळ रात्री पावणे नऊ च्या सुमारास दरड कोसळली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीविहितहानी झालेली नाही. एक्सप्रेस- वेवरील कामशेत बोगद्याच्या तोंडाशी असलेली दरड कोसळल्याने मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती समजताच आयआरबीचे पथक दरड कोसळलेल्या ठिकाणी दाखल झाले आहे. माती आणि दगड बाजूला करण्याचे काम सुरू आहे. मुंबई च्या दिशेने वाहतुक सुरू आहे. रविवारी रात्री साडेदहा च्या सुमारास आडोशी बोगद्या जवळ दरड कोसळल्याची घटना ताजी असताना आता पुन्हा एकदा एक्सप्रेस- वेवर दरड कोसळली आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 27-07-2023 at 22:05 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Landslide again on pune mumbai expressway traffic normal zws 70 kjp