पुणे : राज्यातील खासगी आणि सहकारी दूध संघांची शिखर संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य दूध व्यावसायिक संघटनेने गायीच्या प्रति लिटर दूध विक्री दरात दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.  ही दरवाढ आजपासून (एक फेब्रुवारी) लागू होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पुणे :‘कसब्या’साठी काँग्रेसकडून १६ इच्छुक; उमेदवारांच्या दूरचित्र संवाद पद्धतीने मुलाखती

संघटनेचे सचिव प्रकाश कुतवळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी दूरदृष्य प्रणालीद्वारे महाराष्ट्रातील प्रमुख २२ खासगी आणि सहकारी दूध संस्थांची बैठक झाली. दूध खरेदी दर, दूध पिशवी पॅकिंग आणि वाहतूक खर्चात वाढ झाली आहे. राज्यातील बाजारपेठेत परराज्यातील दूध संघांची विक्री वाढत आहे. त्यामुळे स्पर्धेत टिकण्यासाठी दूधच्या किरकोळ विक्री दरात दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ एक फेब्रुवारीपासूनच लागू होणार आहे. दरम्यान, काही दूध संस्थांनी ग्राहकांवर बोजा पडू नये म्हणून मुख्य वितरक आणि किरकोळ विक्रेत्यांचे कमिशन (सेवामूल्य) कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काही दूध संस्थांचे विक्री मूल्य स्थिर राहण्याची शक्यता आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra state milk federation increase cow milk price by rs 2 per liter pune print news dbj 20 zws