आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी-चिंचवडमध्ये एका तरुणाने विवाहित महिलेवर बलात्कार केला. तसेच दिराने देखील पीडित महिलेवर बळजबरी करत बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्यास प्रतिकार केल्याने दिराने भावजयीचा खून केला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत महिलेच्या दिराने हे कृत्य केलं असून बलात्कार करणारा आरोपी हा मोकाट आहे. ही घटना घोराडेश्वर डोंगरावर असलेल्या झुडपांमध्ये घडली आहे. अक्षय कारंडे. असे फरार आरोपीचे नाव असून दुसऱ्या आरोपीला तळेगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शवविच्छेदन अहवालात महिलेवर बलात्कार झाल्याचं निष्पन्न झाले आहे, अशी माहिती देखील तळेगाव पोलिसांनी दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मृत १९ वर्षीय महिला आरोपी दिरासह रविवारी घोराडेश्वर येथे देवदर्शनसाठी आली होती. दरम्यान, महिलेला आपल्यासोबत काही अघटित घडेल असे वाटले नव्हते. डोंगरावर काही अंतरावर जाताच आरोपी दिराचा मित्र अक्षय कारंडे हा पाठीमागून आला. त्याने १९ वर्षीय विवाहित महिलेवर बळजबरी करत झाडीत नेवून बलात्कार केला. या घटनेने पीडित महिला भयभीत झाली होती. 

हेही वाचा – मूल होत नसल्याने पत्नीला पाजले कोंबडीचे रक्त; तर पती लैंगिकदृष्ट्या सक्षम नसल्याचा पत्नीचा आरोप

पुन्हा, दिराने त्याच ठिकाणी बळजबरी करत बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्यास पीडितेने प्रतिकार केला. याच रागातून २४ वर्षीय दिराने अगोदर ओढणीने गळा आवळून आणि नंतर भावजयीच्या चेहऱ्यावर दगडाने ठेचून खून केला. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी २४ वर्षीय दिराला तळेगाव पोलिसांनी अटक केली असून बलात्कार करणारा अक्षय मात्र फरार आहे. त्याचा शोध तळेगाव पोलीस घेत आहे. 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Murder of a married woman rape in pimpari pune srk 94 kjp