अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आयुष्यभर लढा देणारे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि ‘साधना’ साप्ताहिकाचे संपादक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या निषेधार्थ विविध राजकीय पक्षांनी पुकारलेल्या सर्वपक्षीय ‘बंद’ला बुधवारी समिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसते आहे. दैनंदिन कामकाज ‘बंद’ ठेवण्यासाठी कोणतीही जबरदस्ती नसताना काही दुकानदारांनी, व्यावसायिकांनी उत्स्फूर्तपणे त्यामध्ये सहभाग घेतला. विविध राजकीय पक्षांसह सामाजिक संघटना आणि विद्यार्थी संघटनांनी उत्स्फूर्तपणे हत्येच्या निषेधार्थ मोर्चा काढला.
ठळक घडामोडी
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
- पुण्यातील पीएमपीएमएलची बस वाहतूक सुरू
- शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वर्दळ नेहमीप्रमाणे
- लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, शिवाजी रस्ता जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, केळकर रस्ता, सातारा रस्ता, तानाजी मालुसरे रस्ता इत्यादी महत्त्वाच्या रस्त्यांवरील काही दुकाने बंद तर काही ठिकाणी कामकाज नेहमीप्रमाणे सुरू
- शहरातील रिक्षा वाहतूक सकाळी सुरू होती
- दाभोळकरांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी पुण्याच्या विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा स्वयंस्फूर्तपणे निषेध मोर्चामध्ये सहभाग
- पुणे महापालिकेतील महात्मा फुले यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात
First published on: 21-08-2013 at 12:04 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra dabholkar killing average response for pune bandh