Premium

पिंपरी-चिंचवडमध्ये ५० टक्के तीनचाकी वाहने इलेक्ट्रिक करण्याचे लक्ष्य!

सीएनजी ते इलेक्ट्रिक ऑटोरिक्षा हा बदल शक्य तितका सुलभ आणि किफायतशीर करण्यासाठी ऑटो-मालकांना महापालिकेचे पूर्ण सहकार्य राहील.

pcmc aim to make 50 percent auto rickshaw electric
पिंपरी-चिंचवडमध्ये ५० टक्के तीनचाकी वाहने इलेक्ट्रिक करण्याचे लक्ष्य!(छायाचित्र सौजन्य – द फायनान्शियल एक्सप्रेस)

पिंपरी : शहरातील एकूण तीनचाकी वाहनांपैकी किमान ५० टक्के वाहने ही इलेक्ट्रिक असावीत. रिक्षाचालकांच्या पाठिंब्याने हे लक्ष्य साध्य होऊ शकते. सीएनजी ते इलेक्ट्रिक ऑटोरिक्षा हा बदल शक्य तितका सुलभ आणि किफायतशीर करण्यासाठी ऑटो-मालकांना महापालिकेचे पूर्ण सहकार्य राहील. ई-रिक्षा घेण्यासाठी चालकाला ३० हजार रुपयांपर्यंतचे अर्थसाहाय्य देण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी-चिंचवड ईव्ही सेलच्या पुढाकाराने इलेक्ट्रिक ऑटोरिक्षांचा अवलंब करण्यात येणाऱ्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी बैठक झाली. अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप, सह शहर अभियंता संजय कुलकर्णी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे, रिक्षा संघटनेचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा : ‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर पर्यावरण पूरक मातीच्या गणेशमूर्ती; शिवसेनेचा उपक्रम

सिंह म्हणाले, की रिक्षाचालकांच्या समस्यांचे आणि प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी वेळोवेळी महापालिकेच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. ई-रिक्षा घेण्यासाठी चालकाला ३० हजार रुपयांपर्यंतचे अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे. सीएनजी ऑटोच्या तुलनेत इलेक्ट्रिक ऑटोरिक्षाकडे जाण्याच्या तांत्रिक, पर्यावरणीय आणि आर्थिक परिणामांबद्दल रिक्षा संघटनांना जागरूक केले जाईल. इलेक्ट्रिक ऑटोरिक्षाच्या आर्थिक व्यवहार्यता आणि इलेक्ट्रिक ऑटोकरिता भविष्यात वाहने चार्ज करण्यासाठी चार्जिंगच्या पायाभूत सुविधा निर्माण करता येतील. इलेक्ट्रिक ऑटोरिक्षा घेण्यासाठी इच्छुक असलेल्यांना बँक, तसेच आर्थिक संस्थांकडून करण्यात येणाऱ्या वित्तपुरवठ्याबाबत माहिती देण्यात आली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pcmc aim to make 50 percent auto rickshaw electric in pimpri chinchwad pune print news ggy 03 css

First published on: 11-09-2023 at 10:47 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा