पिंपरी-चिंचवडमध्ये अखेर झिका आजाराची एन्ट्री झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये दोन पुरुषांना झिका आजाराची लागण झाली आहे. त्यांच्यावर शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.
हेही वाचा – चार बांगलादेशी घुसखोरांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केली अटक
महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या डेंग्यूचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. महानगरपालिकेकडून ४६७६ संशयित रुग्णांचे रक्ताचे नमुने हे तपासण्यात आले होते. पैकी, ३९ जणांना डेंगू आजाराची लागण झाल्याचे निष्पन्न झाल आहे. तर, दोन जणांना झिका झाल्याचं समोर आलेले आहे. या दोन्ही रुग्णांवर दोन वेगवेगळ्या खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. झिका आणि डेंग्यू हा आजार एडिस डासांपासून पसरणारा विषाणूजन्य आजार आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून वारंवार स्वच्छता राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अशा आजारांमुळे घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. काळजी घ्यावी, असं सांगण्यात आले आहे.
© The Indian Express (P) Ltd