पुणे रेल्वे स्टेशन येथील ताडीवाला रोडवर असणार्या पार्किंगमध्ये हात बॉम्ब सदृश्य असलेली वस्तू आढळली होती. बॉम्ब शोधक आणि नाशक (बीडीडीएस) पथकास ही बॉम्ब सदृश्य वस्तू नष्ट करण्यात यश आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, पुणे रेल्वेस्टेशन येथील ताडीवाला रोडवरील असणार्या पार्किंगमध्ये साफसफाई करणार्या एका कर्मचार्यास हात बॉम्ब सदृश्य वस्तू दिसली होती. त्यानंतर या कर्मचाऱ्याने रेल्वेच्या अधिकार्यांना याबाबत माहिती देताच, घटनास्थळी रेल्वे पोलीस आणि बीडीडीएसचे पथक दाखल झाले. यानंतर हात बॉम्ब सदृश्य असेलेली ही वस्तू सर्वप्रथम तेथून मोकळ्या जागेत नेण्यात आली. काही वेळा नंतर त्या वस्तूचा स्फोट घडवून आणला आणि त्या वस्तूचे तुकडे गोळा करून, फोरेन्सिक लॅबमध्ये तपासणी करण्यासाठी पाठवण्यात आले आहेत.
