पुणे : पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यासाठी भारतीय लष्कराने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानिमित्त शहर आणि परिसरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. भारतीय लष्कराच्या शौर्याला सलाम करत पेढे वाटप, फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.लष्कराने केलेल्या हल्ल्यांबाबत शिरूर शहरात नागरिकांनी पेढे वाटून, फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. तसेच ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’, ‘भारतीय सैन्य दलाचा विजय असो’ अशा घोषणा देण्यात आल्या.

हाजी आसिफ शेख, नगरसेवक मंगेश खांडरे, भूमिपुत्र प्रतिष्ठानचे सुशांत कुटे, आरपीआयचे शहराध्यक्ष नीलेश जाधव, युवा सेनेचे शहराध्यक्ष स्वप्नील रेड्डी, मराठा संघ घोडनदीचे विश्वस्त सागर नरवडे, मुश्ताक शेख, मुस्लिम युवा मंच अध्यक्ष वसीम सय्यद, राजुद्दीन सय्यद, भारतीय जनता पक्षाचे अविनाश जाधव, प्रवीण तुबाकी, मितेश गादिया, नीलेश खरबस, मंगेश कवाष्टे, रमेश दसगुडे, राम झेंडे, चेतन साठे, पांडुरंग कुरुंदळे, राहील शेख, राजू शेख, प्रितेश गादिया, सचिन गरुडे आदीं उपस्थित होते.

पहलगाम येथे दहशवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा भारतीय लष्कराने बदला घेतला याचा मनस्वी आनंद झाला. त्यासाठी भारतीय सैन्याचे मानावे तेवढे आभार कमी आहेत, अशी भावना स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रोहन सुरवसे-पाटील यांनी व्यक्त केली. पाकिस्तानमध्ये घुसून घेतलेला बदला हे भारतीय सैन्याच्या शौर्याचे प्रतीक आहे. भविष्यात पुन्हा अशा प्रकारचे कृत्य करताना पाकिस्तान हजारदा विचार करेल, असा धडा भारतीय सैन्याने पाकिस्तानला शिकवला आहे. त्यामुळे भारतीय लष्कराने दाखवलेल्या शौर्याला सलाम आहे, असेही त्यांनी सांगितले.

भारतीय लष्कराने पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी केलेल्या ‘मिशन सिंदूर’च्या यशानिमित्त तुळशीबाग व्यापारी असोसिएशनतर्फे तुळशीबागेत पेढे वाटप करण्यात आले. ‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’, ‘भारतीय लष्कराचा विजय असो’ अशा घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर श्री तुळशीबाग गणपतीची महाआरती करण्यात आली. नितीन पंडित, विकास पवार, विनायक कदम, राजेंद्र साखरिया, अमर शहा, राजेश शिंदे, कुशल पारेख, किरण भंडारी, जितेंद्र अंबासनकर, प्रवीण सोनार, चंद्रकांत कोळी, अक्षय पुजारे, अजित सुपेकर, सुनील खेडेकर, अभय शहा, दत्ता बिरादर आदी या वेळी उपस्थित होते.